सकाळ ची वेळ, तीला पुरती जाग पण आली नव्हती, तेवढ्यात तिच्या बाजूला ठेवलेल्या फोनवर
"New Message" च्या notification अलार्म वाजला, तिने किलकिल्या डोळ्यानी फोनच्या
स्क्रीन वर पाहिलं, "New Message from 😍😍😍" !! आता कोण हे, असा विचार
करतच तिने फोन unlock केला, मेसेजेस मध्ये जाऊन चेक केलं, तर तिथे काहीच दिसेना.
तिच्या मनात आलं, काय कटकट आहे, कदाचित तो "text मेसेज" नसून कुणीतरी "WhatsApp"
वर मेसेज असेल, पण तिला माहित होतं, "WhatsApp" चे सगळी "notifications" तिने कधीच
बंद केलेली आहेत, नाहीतर, सत्राशे साठ "WhatsApp" ग्रुप मधल्या "notifications" नी तिला
तिच्या फोनवर दुसरे काही पाहणे, करणे अशक्य झाले असते, किंबहुना ते तसे झालेच होते, म्हणूनच
तिने "WhatsApp" वर फक्त वेळ असतांना जाऊन चेक करायची. तरिही, तीने "WhatsApp"
उघडले, अपेक्षेप्रमाणे, तिच्या कुठल्याच ग्रुप मध्ये तो मेसेज नव्हता. मात्र त्या निमित्ताने तिने विनाकारण
३/४ forwards वाचून घेतले, विषय अर्थातच "आयुष्य कसे जगावे", " समस्त स्री जातीच्या बिनडोक (अपवाद
फक्त कामवाल्या बायकांचा) पणांवरचे कंटाळवाणे विनोद".
गॅसवर चहाचं भांडं ठेवत असतांना तिच्या लक्षात आलं, की "त्या" मेसेजचा notification "अलार्म"
वाजला होता, आणि तिने तो पण बंद ठेवला आहे, फक्त फोन हातात घेतला की मेसेजेस दिसायचे
स्क्रीनवर. जाऊ द्या, किती तो पाठपुरावा एका न आलेल्या मेसेजचा, असा विचार करुन, ती नेहमीच्या
कामांना लागली. मग दिवसाच्या भोवर्यात ती रमून जगण्याचा खेळत राहिली. रात्रीच्या जेवणानंतर
ची आवरासावरी करत असतांना पुन्हा तोच "New Message" च्या notification अलार्म वाजला,
तिने फोनच्या स्क्रीन वर पाहिलं, "New Message from 😍😍😍" !! फोन unlock करुन तिने पुन्हा
एकदा तिने "IM", "WhatsApp' अाणि इतरही अॅपस चेक केलीत, आता ते "notification"
ही दिसत नव्हतं, त्यामुळे, पुढच्या वेळेला, unlock करुन मेसेज शोधण्याची घाई न करता
ते notification नीट चेक करुया, असं तिने ठरवलं. तिला त्या साठी जास्त थांबावं लागलंच
नाही, जेवणानंतरचा TV बघत असतांनाच पुन्हा तोच "New Message" च्या notification
अलार्म वाजला, तिने फोनच्या स्क्रीन कडे ठरविलेल्या प्रमाणे शांतपणे बघितलं, तर तसं काहीच
विशेष असं दिसलं नाही, फोन नंबर नव्हताच, फक्त ते बदामी डोळे मात्र स्थिर नसून मिस्किलपणे
त्यांची उघडझाप होतेय, हे तिच्या लक्षात आलं. तिने फोन हातात घेतला, आणि पुन्हा IM आणि
"WhatsApp" ची सेटिंग्स नीट चेक केली, IM फक्त स्क्रीनवर notification दाखवणार, नो अलार्म,
आणि "WhatsApp" ची तर सगळी notifications बंद !! इतर कुठलं अॅप असली notification
देऊ शकेल कां, हे ही तिने सगळ्या apps वर नजर फिरवीन चेक केलं. शेवटी, थोड्याशा अनिच्छेनीच
तिला झोपायला गेली. दुसरी दिवसाची सकाळ नेहमी पेक्षा जास्ती गडबडीची, आॉफिस मध्ये पोचल्या
पोचल्या तिने पर्स ड्रॅावर मध्ये टाकायच्या आधी फोन काढला, डेस्क वर ठेवला. तिच्या लक्षात आले,
आज आता पावेतो, तो मेसेज नाही. तिला अचानक काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. ती तिच्या
desktop कडे वळून लॉगिन करतच होती, तेव्हढ्यात, हो तो तोच होता, notification अलार्म
"New Message from 😍😍😍" !! त्या बदामी डोळ्यांची उघडझाप ती कितीवेळ बघत
होती देव जाणे, इतक्यात तिच्या अॅाफिसचा फोन वाजला, आणि ती भानावर आली.
ती तिची त्याच्याशी पहिली भेट. मग तो भेटतच राहिला, एकदा कुठल्यातरी मिटींग्स नंतर,
तिला निराश वाटत होतं, आणि ती खिन्नपणे आॉफिसच्या पायर्या उतरत होती, आणि
फोन वाजला, तिनं पाहिलं, "New Message from 😍😍😍" !! तिला तिच्या त्याही
परिस्थीतीत हलकं वाटून गेलं. एकदा दुपारी तिच्या डेस्क वर कामातून डोकं वर काढून,
कॉफी पीत असतांना, तो असाच वाजला होता, अॉफिसच्या कलिग्स बरोबर लंच घेत
असतांना, एवढ्या गर्दीत ही त्याने तिला खुणावलं होतं. कधी पार्कींग लॉट मधून येतांना
तिची सोबत केली होती.
तो notification चा अलार्म ऐकण्यासाठी ती तिच्याही नकळत ती फोन सतत स्वत:जवळ
ठेवू लागली. एका मिटींग ला जायचं म्हणून तिने फोन सायलेंट वर टाकला होता, ते ती
विसरलीच, संध्याकाळी आयुष्याच्या हजार गोष्टींबद्दल विचार करत, ग्रोसरी शॅापिंग करत
असतांना तिचा फोन वाजला, अर्थात तो कॉल नव्हताच, तो notification चा अलार्म, हो
तोच, आणि तिला "New Message from 😍😍😍" !! बरोबर दिसलं, तिच्या
मैत्रिणीचे ३ मिस्ड कॉल्स! हो फोन अजूनही सायलेंट वर होता तिचा! आता मात्र ती जरा चरकली.
घरी जाऊन ग्रोसरी बॅग्स तशाच टाकून सोफ्यावर बसून तिने पुन्हा सगळी apps आणि notifications
settings पुन्हा पुन्हा तपासले. नको असलेले, वापरात नसलेले un-install केले.
काहीश्या अस्थिर मनस्थितीतच संध्याकाळ घालवली, तिची नजर क्षणाक्षणाला फोन कडे
जात होती, आणि blank स्क्रीन बघून कुठेतरी हायसं वाटत होतं, तरी एका कोपर्यात काहीतरी
तुटल्याची जाणीव. रात्र तशीच गेली, दुसर्या दिवशी अॉफीस फोनवर बोलत होती ती, आणि
तो वाजला, तो दिसला! ती आपण फोनवर काय बोलत आहे हे विसरुन ती त्याच्याकडे
बघत राहीली.
त्या संध्याकाळी तिने मग गेले कित्येक महिने मागे पडून राहिलेलं, फोनवरचं OS upgrade
करुन घेतलं. तिची बुद्धी तिचे काम करीत होती. तिचे मन मात्र कुठल्या तरी अज्ञात ओढीने
खेचल्या जात होते, आणि ह्यात तिची मात्र फरफट होत होती.
सकाळ उजाडली ती त्याच्या आवाजानंच, तिला एकदम हसूच आलं, एखाद्या हट्टी मुलानं
सगळ्यांना झिडकारून आपल्या आईकडे धाव घ्यावी किंवा कोवळ्या प्रेमात ती नको नको
म्हणत असतांना, तिच्या त्याने, तिला भर पावसात भेटायला यावं, तसंच काहीसं.
आणि दुसर्याच क्षणाला ती भानावर आली, तरीही फोन क्षणभरही दूर झाला तर तिला
अपूर्ण वाटायला लागलं, त्या बदामी डोळ्यांची आवाहनं तिला खुणावत राहिली.
पण तिची बुद्धीही तिच्याशी प्रामाणिक होती. ती तिच्या परीने, तिला मदत(!) करीतच
होती, कुठे WhatsApp upgrade कर तर कुठे cellular data off करणं, missed
calls चेक करणं, आणि contacts मधून प्रत्येकाचे प्रोफाईल फोटो, स्टेटस सगळं
नीट नजरेखालून घालणं. त्याचा माग लागत नव्हता. तिची फरफट वाढत होती,
मिटींग्स ला फोन न नेणे, रात्री फोन उशाशी न ठेवणे, असे अघोरी उपाय करुन ती
करत होती, गेले दोन/तीन दिवस तर तीने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन ती त्याच्या पासून
दूर राहिली होती.
त्या दिवशी ती सकाळी उठली, फोन हातात घेतला, आणि तक्षणीच तिच्या लक्षात आले
आपण charging ला लावायाला विसरलो. तो dead फोन घेऊन ती charging ला
लावणार, तेव्हढ्यात तो आला, हो तो पुन्हा आला होता, तिच्या साठी,
"New Message from 😍😍😍" !! ती त्याच्या बदामी डोळ्यांत अनिमिष नजरेने