त्या नात्याचा जन्मच मुळी "कां" ह्या प्रश्नासकट झाला होता. मी बासष्ट वर्षांची आणि तो चौतीसचा.
मी कशाच्याच शोधात नव्हते, काहीतरी सापडावं असं वाटण्याच्या पलिकडे गेले होते. त्याचं अर्थातच
मला नाही, पण तो मला शोधत नव्हता हे नक्की.
विश्वाने एक दार उघडलं आमच्यासाठी, आणि आम्ही त्या दारातून सहज प्रवेश केला. त्याने माझ्या
आयुष्याला परिसस्पर्श केला. ते दिवस जादूई होते. कित्येकदा रात्री झोप यायची नाही कारण झोपेत
पडणार्या स्वप्नांपेक्षा मला माझं वर्तमान हवंहवसं वाटतं होतं.
माझ्या आयुष्यातले ते पहिले प्रेम खचितच नव्हते, आणि मी सुद्धा काही त्याची पहिली किंवा शेवटची
प्रेमाची व्यक्ती नव्हते. पण त्या वेळेला आम्ही प्रेमात होतो एकमेकांच्या, सगळ्या जगापासून वेगळे,
आणि ते तसं असणं फार सुंदर होतं.
वर्षभरातच मी त्याला जाऊ दिलं. प्रेमाची जादू उतरली म्हणून नाही किंवा उतरावी म्हणूनही नाही. तर
ह्या नात्याचा जीवघेणा असला तरी तोच अटळ शेवट आहे, हे मनोमनी जाणून.
लोक ज्याला प्रेम समजतात, त्याची जागा, वेळ आणि वय थोडीचं ठरलं असतं.
मी मेल्यानंतर, माझे कुटुंबिय माझ्या उरल्या-सुरल्याची आवरासावर करतील. त्यांना त्याच्या कुठल्याच
खुणा सापडणार नाहीत. सगळे पुरावे नाहिसे केले गेलेत, आणि आठवणी मनाच्या कप्प्यात बंदिस्त केल्या
आहेत. फक्त ह्या संगिताच्या चार सिडीज वगळता. त्याने ह्या सिडीज् माझ्यासाठी तयार केल्या होत्या.
त्याला मला काहीतरी मोलाचं द्यायचं होतं. त्याला मला द्यायचं होतं, काहीतरी त्याच्या प्रेमाचं, खुप जवळचं,
त्यानं मला ही गाणी दिलीत.
ह्या सिडीज् त्याचं सन्मानचिन्ह तसंच एका विदीर्ण झालेल्या हृदयाचंही !
प्रेम हा प्रश्न नव्हे, सगळं आयुष्य खर्ची न घालता अगदी सहज तुमच्या ओंजळीत येऊन पडलेलं
उत्तर आहे.
("Museum of Broken Relationship" ह्या संग्रहातील एका entry वर आधारित)