आठवणीतला पहिला आरसा, आजीचा. माजघरातल्या एका भिंतीच्या कपाटात तिची कुंकवाची
पेटी. रोज सकाळी आंघोळ करुन ती पेटी उघडून त्यातील कुंकू भिंतीवरच्या एका मोठ्या खुंटीला

लटकविलेल्या त्या आरशात पाहून लावायची. त्या आरशाची चौकट अगदी जाडजूड, जुन्या
लाकडाची. आधी किती पिढ्यांनी तो आरसा वापरला असेल कोण जाणे. वापरुन वापरुन त्या
लाकडाचा मूळचा रंग कोणता हे ओळखू न येण्याइतका बदलला होता. त्या आरशात पाहायला
तशी माझी उंची कमी पडायची आणि उड्या मारुन मी दमायचे. कधीतरी मोठ्या भावंडांना
हट्ट केला ते उंच धरुन काही सेकंद त्या आरशात पाहू द्यायचे. त्या ६ बाय ७ इंचाच्या, बाजूबाजूने
पारा उडालेल्या आरशात उंच उडी मारुन त्या वयात आपलं प्रतिबिंब पाहण्यामागची नक्की
इंन्स्टीक्ट काय होती याचं मला अजूनही कुतुहल आहे.
माझ्या आठवणीतल्या दुसर्या आरशाला मात्र व्यवस्थित स्पेस मिळाली होती. काळ्या शिसवी
लाकडाचा साडेतीन-चार फूट उंचीचा ड्रेसर आणि त्यावरचा तो आरसा. अर्थात आरसा खूप
मोठा नाहीच. पण त्याच्यासमोर एक तेलाची बाटली आणि एक पावडरचा डबा, एवढीच काय
ती प्रसाधनं. बाकी जागा सुई-दोरा, कात्री, सेफ्टीपिन्स, अशा नेहमीच्या उपयोगाच्या वस्तूंनी
व्यापलेली. ह्या आरशाने मात्र आजीच्या आरशा एवढे टक्के टोणपे खाल्ले नव्हते, त्यामुळे
सणासुदीला तयार झाल्यावर तिथल्याच एका खुर्चीवर चढून आपल्या दागिन्यांचं, कपड्याचं
त्या आरशात प्रतिबिंब बघितल्याचं आठवतं.
काही वर्षातच घरात गोदरेज कपाट आलं. त्याच्या डावीकडच्या दारावर असलेल्या तीन-चार फूट
उंचीच्या आरशाचे आकर्षण घरातल्या लहानथोरांना कितीतरी वर्षे पुरले. आई-बहिणींनी
साड्या नेसल्या की त्या अारशात पाहूनच निर्या/पदर ठिकठाक करणे, नुकत्याच कॉलेजमध्ये
जाऊ लागलेल्या भावाने जातायेता आपला भांग नीट करणे, चेहर्यावरची मुरुमांचे निरीक्षण,
आईला अचानक दिसलेला पांढरा केस, बहिणीच्या केसांची लांब वेणी नक्की कुठपर्यंत येतेय
हे पाहण्याचा तिचा सोस, बाळाचा धरुन उभं राहून स्वत:चा चेहरा दिसताच तोंडभरुन हसणं,
दोन्ही वेण्या सारख्या उंचीवर बांधल्या गेल्या आहेत ना हे रोज सकाळी शाळेत जायच्या
आधी त्या आरशातच तपासल्या जायचं. हा आरसा कुटुंबातल्या प्रत्येकाच्या वाढीचा मूक
साक्षीदार होता. प्रत्येकानं त्याच्याशी कधीतरी मनीचे गुज सांगितले होते, अनुभवले होते.
नंतरचा आरसा आला तो मात्र अगदी स्वत:चा आब राखून/रुबाब दाखवत. ड्रेसिंग टेबल !
एकच नाही तर एक मोठा आणि दोन छोटे आरसे, त्या समोर प्रसाधनांची ही भली मोठी
रांग. कंगव्यांचेच चार/पाच प्रकार. ड्रेसिंग टेबलवर टाकायला म्हणून कोस्टर सारखाच
एक मोठा ओव्हल आकाराचा आणि दोन छोट्या गोल आकाराचे, कापडाचे शोभिवंत
तुकडे असतात, आणि त्यांना डचेस सेट अशी ज्ञानात भर पडली. मग क्रॉसस्टीच/ क्रोशा
यांचे हे डचेस सेट तयार करणे, प्रेझेंट देणे हे उद्योग काही काळ चालले. आता ड्रेसिंग टेबलच्या
आरशासमोर बसून केशरचना करणे हे परिचीत दृष्य झाले.
कुणीतरी खूप नाजूक सुंदर पितळी कलाकुसरीची महिरप असलेला एक आरसा भेट म्हणून
दिला, तो समोरच्या बैठकीच्या खोलीत लावायचा नाही हे निक्षून सांगण्यात आले. आयुष्यातलं
आरशाचं स्थान तसं अजून मर्यादितच होतं. काळाची चक्र फिरतच होती, आजूबाजूला
होणार्या बदलांच्या धुमार्यात.
ह्या धुमार्यात आरसाही बदलत होताच. आता घरात बेडरुममध्ये क्लॉजेट ला भिंतीच्याच आकारांचे
आरसे, बाथरुम मध्ये सुध्दा एका भिंतीचा अर्धा भाग आरशांनी व्यापलेला. प्रतिबिंब नीट/ स्पष्ट दिसावे
म्हणून हायपॉवर बल्ब ही लावलेत. कुठेही न जाता येता, कुठलाही यत्न न करता हे आरसे दाखवत
असतात आपल्या प्रतिमा.
खरंच, आताशा प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसायला लागली आहेत पण त्यात स्वत:ला पाहण्याची
दृष्टी?