प्रेम करावे एकमेकांवर
पण त्या प्रेमाचे व्हावे न बंधन |
एक वाहता समुद्र असावा
दोन आत्मांच्या किनाऱ्यांमधला ||
एकमेकांसाठी भरावे प्याले
पण न प्यावे एका प्याल्यातून |
वाढावे ताट एकमेकांचे
पण न जेवावे एका ताटातून||
गावे अन नाचावे बरोबर
पण तरी असू द्यावे एकाकीपण |
तारा सतारीच्या जपती अंतरा जरी
पण एकच झंकार उमटे तरी ||
द्यावे ह्रदय खुशाल पण न मालकी त्याची
ती तर केवळ आयुष्याची ओंजळ धरली आहे त्याची |
कुणासाठी तरी जगणं
ही तर आहे प्रतारणा आयुष्याशी ||
उभे असावे एकत्र पण नाही खूप जवळ
जसे देवळाचे दोन स्तंभ मनोरम |
कारण दोन स्वयंभू वृक्षे नाही बहरत
एकमेकांच्या सावलीत ||
( खलिल जिब्रान यांच्या "Love one another" ह्या कवितेचे भाषांतर)
लमाल ऑक्टोबर २०२० "बंधन"