Thursday, October 24, 2013

संवाद

संवाद

एखाद्या पोहता न येणाऱ्या
माणसानं तरंगत राहण्यासाठी
जीवाचा आटापिटा करत हातपाय
मारावेत तशीच सुरु असते
आपली आजूबाजूच्या जगाशी
संवाद साधण्याची पोरकी धडपड !

अनेक विसंवादाच्या क्षणांमध्ये
आपल्याला ह्या संवादाच्या
अनेकपदरी जाळ्याचा फोलपणा
जाणवला असतो, पण तरीही
ते विसंवादाचे धागे अलगद, शिताफीनं
दूर करुन आपण ह्या संवादाच्याच जाळ्यात
स्वत:चं गळकं अस्तित्व गोळा करत असतो.

त्या विसंवादाच्या क्षणांपलिकडच्या एकाकी
अरण्यात जाणे कसंही करुन टाळत राहतो,
जीवाचा आटापिटा करत ... तो ह्या
प्रवासाचा अटळ शेवट हे मनोमनी जाणूनही.

No comments:

Post a Comment