सकाळी उठल्यावर खिडकीतून
बाहेर डोकावण्या आधीच
weather.com पाह्यलं जातं,
निसर्गाला आयुष्यात
सुरक्षित अंतरावरच ठेवल्या जातं
Google Earth आणि Google Sky
नंतर Google Mind येणार अहे
तुमच्या मनाचे कानेकोपरे
सगळे जग पाहणार आहे
सगळी माणसं मिडीया च्या
भोवर्यात अडकलेली,
जे दूरवर सुरक्षित आहे
त्यांच्या मागे लागलेली
जमलेली मैफिल,
रंगलेल्या गप्पा
मध्येच ओरखडा ....
texting beep चा !
दिवस उजाडतो
laptop उघडतो
new e-mail चा
कोंबडा आरवतो
सुरुवात e-mail नं, नंतर फोनवरचं बोलणं,
पुढच्या गप्पा chat वर, आणि उरलेलं SMS/scrap नी
बोलुन झालं, तरी सुध्दा प्रत्यक्ष भेटल्यानंतर,
चार दिवसांतच आपल्यातलं
अनोळखीपण भेटायला आलं .....
आयुष्याच्या शेवटी त्याला
अंतिम सत्य उमगलं
विकिपिडीया वर आपली entry नाही,
तेव्हा सगळं जगणं व्यर्थ गेलं
एका संध्याकाळी फुरंगटलेली ती,
त्यानं प्रेमान विचारताच, मुसमुसत म्हणाली,
"आपलं लग्न Bharatmatrimony ऐवजी shaadi.com
वरचं ठरायला हवं होतं, माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न
त्याचं साईट वरुन ठरलीहेत ...."
पुर्वी जात्यावर बसल्या बसल्या
बायकांना ओव्या सुचायच्या म्हणे,
मी मात्र फूड प्रोसेसर लावून दमले,
पण एकही शब्द नाही उमटला ....
“पुर्वी जात्यावर बसल्या बसल्या
ReplyDeleteबायकांना ओव्या सुचायच्या म्हणे,
मी मात्र फूड प्रोसेसर लावून दमले,
पण एकही शब्द नाही उमटला ....”
आपल्या ‘generation’ चं दुखरं दुखणं! 😁😆👌🏼