Saturday, April 11, 2015

आजार

 आजार म्हणजे दूरवरच्या अंतिम मुक्कामाची ओझरती खूण जाणवणं

आजार म्हणजे जगप्रवाहाच्या काठावर बसून  जगरहाटी न्याहाळणं

आजार म्हणजे पळत असलेल्या जगातून घेतलेला स्वल्पविराम
आजार म्हणजे सक्तीचा स्वत:बरोबरचा संवाद !

आजार म्हणजे आपलं शरीर, आपलं मनं परिपूर्ण नाही हे जाणणं
आजार म्हणजे अस्तित्वाचा हेतू अपरिहार्य आहे हे नाकारणं !

आजार म्हणजे परिचीत जगात तिर्हाईत ची भूमिका वाट्याला येणं
आजार म्हणजे आयुष्याच्या जिगसॉ कोडे सोडविण्याची रित पुन्हा पुन्हा तपासणं !

No comments:

Post a Comment