आजकाल कुठल्याही घटनेकडे बर्याचदा स्वत:च्या संदर्भातून विचार करतांना परंपरा/आजूबाजूला असणार्या व्यक्तींचे विचारप्रवाह/ वाचलेल्या गोष्टींमधून कळत नकळत घडले गेलेले संदर्भ ह्या सगळ्या गोष्टींना पार कडून स्वत:पर्यंत पोहचण्याचा बरेचदा अयशस्वी पण प्रयत्न सुरु असतो. अर्थात स्वत: पर्यत पोचल्यानंतर काय दिसेल हे अनपेक्षीतच. मग एक मजेदार सामना सुरु होतो स्वत:शी.
कधीतरी मी आशिषबरोबर पालोमार observatory माऊंटन गेले होते. जय भारतात! ही observatory Palomar State Park आहे, म्हणजे जंगलातच!
दुपारी मी एकटीच monastery च्या मागच्या भागात झाडांना सोबतीला घेत, थोडीशी फिरले आणि एक छानशी जागा पाहून नुकतेच भारतातून आणलेलं पुस्तक वाचलं. अर्थात मनावरची बंधन/आवरणं सहजपणे गळून पडावीत अशी ती वेळ. मी पुस्तकांमधील एक-दोन वाक्यं डोळ्याघालून घालावीत, पण त्यांच्या अर्थाचे तरंग मनात उमटुच नये अशी आजूबाजूला वातावरणाची मोहीनी, असा सगळा आसमंत मी मनसोक्त मनात उतरवून घेतला.
संध्याकाळी आशिष परत आला, obersavations मुळे रात्रीचं जेवण ५ वाजताच करुन observatory ला गेलो. बराच वेळ internet surfing, दक्शिणरंग वाचन यांच्या सोबतीला घालवून सुद्धा तिथे जास्ती वेळ बसणं कठीण झालं. Obsevatory ते monastery अगदीच अर्धा किलोमीटर अंतर, पण बराच उशीर झाला होते, म्हणून आशिष म्हणाला पोहचवून देतो तुला. आम्ही दोघं dome च्या बाहेर आलो, आणि मी पाऊल बाहेर ठेवताच, मी फक्त ओरडण्याची बाकी राहीले होते. इतका मिट्ट काळोख. काळोख ह्या शब्दाचा अर्थ जाणवला त्या क्षणाला. Observatory असल्यामुळे आजूबाजूला अजिबात दिवे नसतात, आणि ऊंचीवर, जंगलात. आशिष ने कार सुरु केली आणि परिसर कार च्या दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला. Monastery नावाप्रमाणेच आहे, १२ खोल्यांची ही building! खोल्यांमध्ये आतुन एक नावापुरती कडी, मात्र बाकी दारं सदैव उघडी ! अाणि माझ्या सुदैवाने(!) त्या दिवशी, रात्री तिथे माझ्या शिवाय कोणीही नव्हतं. आशिष तर परत निघून गेला. मी आपली monastery च्या दुसर्या मजल्यावरच्या कोपर्यातल्या खिडकीत “वह कौन थी” स्टाईल ने उभी, आशिष ला बाय करत.
खरंतर मला तशी भिती वाटत नाही, पण त्या भावनेला नक्की काय म्हणावं हे ही कळेना. आपल्याला नक्की काय वाटतेय, याचं उत्तर आलं, तेच आलं, भिती !
कां वाटतेय: मी एकटी आहे!
म्हणजे काय: एक जंगल आहे, हो मोठे घर आहे, त्यात मी एकटी आहे, सगळ्यात जवळच दुसरं घर/building अर्धा किलोमीटर अंतरावर.
काय होईल असं वाटतंय: भुतं येतील? इकडे कां येतील? इथे असे माझ्यासारखे कित्येक जण येऊन राहत असतात.
चोर येतील? त्यांना कुठे माहित मी इथे आहे ते. मग आजच कां येतील?
ही जागा नवखी आहे, म्हणून भिती वाटते, पण मग ह्याच जागेत दुपारी इतके रम्य क्षण घालवलेस तेव्हा नव्हती ही जागा अनोळखी? नवखी?
…….
आणि अशा तर्हेने डोळ्यासमोर पुस्तक धरुन, सगळ्या खिडक्या आणि एकमेव दाराची कडी गच्च लावून मी पहाटे पर्यत त्या अनामिक भितीशी सामना करत राहीले, न भिता :-)
अर्थात त्यात रात्र गेली, त्यामुळे तो सामना मी जिंकला/हरला हे न कळून सुद्धा मी शांतपणे झोपी गेले !
तशी मला खरंच भिती वाटतं नाही पण !!!
No comments:
Post a Comment