(मूळ कविता: Happiness by Raymond Carver)
पहाटेच्याही आधीची ही वेळ
सूर्य अजून उठायचा आहे,
मी कॉफीचा मग घेऊन
खिडकीजवळ बसलो आहे,
आणि मनातल्या रोजच्या व्यवहारातल्या
गोष्टींना विचार मानतो आहे.
तो मुलगा आणि त्याचा मित्र
रस्त्यावर चालत आहेत
वर्तमानपत्राचे वाटप करत.
डोक्यावर कानटोपी आणि अंगात स्वेटर्स,
एका मुलाच्या खांद्यावर वर्तमानपत्रांनी
भरलेली बॅग, एकमेकांशी बोलत ही नसलेली
ही मुले किती आनंदात दिसताहेत.
त्यांना शक्य असतं तर त्यांनी धरले असते
एकमेकांचे हात,
ह्या पहाटेच्या वेळेला, ते असली गोष्ट एकत्र करताहेत.
आजूबाजूच्या शांततेला धक्का न लावत ते चालत येतात,
प्रकाश दूर क्षितीजावर पसरतो आहे,
तरिही पाण्यावर पुसटसा चंद्र रेंगाळतो आहे.
हे क्षणाचे सौंदर्य, क्षणिक खचितच नव्हे,
या क्षणाला भेदून जाईल असे काही नाही.
मृत्यु, महत्वाकांक्षा, ईर्षा आणि प्रेम देखील नाही.
आनंदाचे क्षण, सौंदर्याच्या अनुभूतीचे क्षण.
अनपेक्षित, अनाहूतपणे येतात.
त्यांची मजल पार दूरवर गेलेली असते,
वर्तमानाची धूळ नाकारुन,
त्यांचे ठसे बर्याच काळ मनात रेंगाळणारे,
एखाद्या पहाटे त्यांना शब्दात पकडण्याच्या पलिकडचे !
(लमाल, १४ डिसेंबर २०१३)
पहाटेच्याही आधीची ही वेळ
सूर्य अजून उठायचा आहे,
मी कॉफीचा मग घेऊन
खिडकीजवळ बसलो आहे,
आणि मनातल्या रोजच्या व्यवहारातल्या
गोष्टींना विचार मानतो आहे.
तो मुलगा आणि त्याचा मित्र
रस्त्यावर चालत आहेत
वर्तमानपत्राचे वाटप करत.
डोक्यावर कानटोपी आणि अंगात स्वेटर्स,
एका मुलाच्या खांद्यावर वर्तमानपत्रांनी
भरलेली बॅग, एकमेकांशी बोलत ही नसलेली
ही मुले किती आनंदात दिसताहेत.
त्यांना शक्य असतं तर त्यांनी धरले असते
एकमेकांचे हात,
ह्या पहाटेच्या वेळेला, ते असली गोष्ट एकत्र करताहेत.
आजूबाजूच्या शांततेला धक्का न लावत ते चालत येतात,
प्रकाश दूर क्षितीजावर पसरतो आहे,
तरिही पाण्यावर पुसटसा चंद्र रेंगाळतो आहे.
हे क्षणाचे सौंदर्य, क्षणिक खचितच नव्हे,
या क्षणाला भेदून जाईल असे काही नाही.
मृत्यु, महत्वाकांक्षा, ईर्षा आणि प्रेम देखील नाही.
आनंदाचे क्षण, सौंदर्याच्या अनुभूतीचे क्षण.
अनपेक्षित, अनाहूतपणे येतात.
त्यांची मजल पार दूरवर गेलेली असते,
वर्तमानाची धूळ नाकारुन,
त्यांचे ठसे बर्याच काळ मनात रेंगाळणारे,
एखाद्या पहाटे त्यांना शब्दात पकडण्याच्या पलिकडचे !
(लमाल, १४ डिसेंबर २०१३)
No comments:
Post a Comment