इन्ग्रिडने पुन्हा एकदा आपली पर्स चाचपून बघितली. चोरीमारी हा जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या डॉमेनिकन रिपब्लीकन ह्या देशात ती जन्मली आणि वाढली होती, त्यामुळे स्वत:च्या नकळत ती आपली पर्स मिनीटा-मिनीटाला आपल्या जवळच आहे ना, याची खात्री करुन घेत होती. आज सकाळीच तिने बॅंकेमध्ये जाऊन तिच्या खात्यातले उरले-सुरले पैसे काढून आणले होते. नंतर ती ग्वागाजने तिच्या एल वॅले ह्या गावाहून मिचस ह्या पूर्व किनार्यावर असलेल्या गावात आली होती. ग्वागाज म्हणजे सिटी बस आणि शेअर्ड टॅक्सी ला जर एकत्र केलं, तर तयार होणारं वाहन. ती या आधी पण मिचस ला आली होती, पण तिच्या तेव्हाच्या आणि आताच्या मन:स्थितीत ती सोडल्यास काहीच सारखं नव्हतं.
कसेबसे जमविलेले, दिड हजार डॉलर्स देऊन ती आज आपलं गाव/देश सोडणार होती. गरिबीत जन्म, थोडीफार शाळा शिकली, जमेल ते काम करायचं, पोट भरेल एवढे कसेबसे मिळवायचे, एक तोडकं-मोडकं लग्नं काही काळ तग धरुन होतं, पण तेही इन्ग्रिड च्या ह्या गाव/देश सोडून जाण्याच्या निर्णयाने निकालात निघालं होतं. ह्या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्टीनी कधी इन्ग्रिडची साथ सोडली नाही, ती म्हणजे दरदिवशी उगवणार्या सूर्यासारखा फिरुन उभा ठाकणारा तो पैशाचा विचार.
वडील तर तिला आठवतच नाही, आईने तिचा आणि तिच्या मोठ्या बहिणीचा, पेनेलोपे चा जीव
असेपर्यंत, जीव पणाला लावून सांभाळ केला. पेनेलोपेने शाळेत असतांनाच तिच्या आईच्या तब्येतीने
त्या दोघींना ह्या उभ्या जगात एकटे करुन सोडले होते. दिवसागणिक घरी येणारा पैसा कमी होत होता
आणि त्या पैशावर अवलंबून राहणाऱ्या गोष्टी मात्र वाढत होत्या. हे मुळातच न जमणारे गणित, त्यात
आईच्या तब्येतीने त्यात हाताशी घ्यायला काहीच उरले नव्हते. इन्ग्रिड ला अजूनही ते दिसवस, त्या
रात्री आठवतात, वयानुरुप परिस्थितीचा पुरेसा अंदाज नव्हता, आईच्या ढासळणाऱ्या तब्येतीचे
गांर्भिय खोलवर जाणवले नव्हते. इन्ग्रिड ला त्या काळात केवळ तिच्या वयाने तारुन नेले. पेनेलोपिचा
मित्र नवरा झालेला आईने पाहिला. जणू आता तिच्या संसाराला आधार मिळाला, ह्या समाधानात
तिने निश्वास सोडला, शेवटचा!

त्या दोघी बहिणींना जगायला पैसा लागतो, ह्या सत्याला त्यांची तयारी असो वा नसो सामोरे जावे लागत होते. त्यांचे गरिबीच्या चौकटीने जखडून टाकले होते. पेनेलोपेच्या नवऱ्याने आई गेल्यानंतर १/२ वर्षे अगदी जुजबी कां होईना, तिच्या आयुष्याला टेकू दिला. आणि मग शाळेच्या शेवटच्या वर्षाला असतांनाच तिला अल्बर्टो भेटला. पेनेलोपेचा तो कधीच आवडला नाही. पण तिही स्वत:च्या संसाराच्या भविष्याच्या चिंतेत. तिच्या नवऱ्याच्या डोक्यात हा देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन काम शोधायचे हा किडा शिरला होता. आता आपला देश, आपली बहिण एकीकडे आणि नवऱ्याचे खूळ दुसरीकडे. आणि त्याच वेळी इन्ग्रिडने आपला अल्बर्टोबरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव बहिणीसमोर मांडला. पेनेलोपेचा अल्बर्टोला असलेला विरोध तिच्या आयुष्यातील अस्थिरतेने काढून घेतला. तिने इन्ग्रिडला परवानगी दिली आणि इकडे नवऱ्याला "तिला बरोबर नेण्याची अट" घातली.
पेनेलोपे कॅनडात पोहोचली हे कळेपर्यंत इन्ग्रिडचे लग्न जुने झाले होते. वेड्या वयात, वेडी स्वप्नं बघितल्याची किंमत तिला मोजावी लागली. पेनेलोपेला जाऊनही आता तीन वर्षे होत होती. सहवास नसला तरी नात्याच्या जवळीकीचा एक चिवट धागा टिकून होता दोघींमधला. जमेल तेव्हा, जमेल त्या मार्गाने त्या एकमेकींशी संवाद साधत. पेनेलोपेचे तिथे अजूनही बस्तान बसत नव्हते आणि तिच्या नवऱ्याच्या अस्थिरतेचा किड्याने पेनेलोपेचा संसार पोखरुन निघाला होता.
'योला' तयार आहे अश्या गलक्याच्या आवाजानं ती वर्तमानात आली आणि पन्नास/साठ लोकांचा घोळका ज्या दिशेने जात होता, त्यांच्या बरोबर चालू लागली. संध्याकाळची वेळ, अंधाराची पावलं जाणवायला लागली होती, हवेत धूळ आणि त्या बरोबरच मिणमिणत्या दिव्यांचा धूर .. तिला एकदम कोंदटल्यासारखे झाले, पुन्हा आपल्या खोपटात जाऊन पडावे असे तिला क्षणभरासाठी वाटून गेले. पेत्रोने तिला बरोबर फक्त एक कपड्याचा जोड घ्यायला बजावाले होते. ती पिशवी आणि पर्स एवढंच आणि इतकंच तिच्या बरोबर तिची सोबत करत होतं. ती तिच्या बरोबर चालणारे चेहरे बघत होती, पण त्यात एखादा ओळखीचा दिसेल अशी पुसटशी देखील आशा तिच्या मनात नव्हती.
ते एकेकाला 'योला' मध्ये चढवत होते, ती पण चढली. एका बेंचवर बसल्यानंतर तिला काहीतरी सुटल्यासारखं झालं, खुप वेळ रोखून ठेवलेला श्वास सोडावा तसं. तिच्या आयुष्याला असलेली गरिबीची चौकट नाहीशी होतेय असा हळूवार भास तिला झाला. अर्थात त्या स्वप्नात रमून जाणे तिला झेपणारे नव्हते.
"रोखण्यासाठी कुंपण नाही, ओलांडून जाण्यासाठी पूल नाहीत, रस्त्यात तपासण्या करणार्या सीमा सुरक्षा दलाच्या चौक्या नाहीत, अनंत मैल पसरलेलं आणि गिळून टाकणारं वाळवंट नाही" असी ज्याची ओळख करुन दिल्या जाते तो जवळपास ८० मैलाचा समुद्रातील "मोना पॅसेज" हिस्पनिओला बेटं आणि उत्तर अमेरिकेच्या पोर्तो रिको प्रदेशांना विभागतो. इन्ग्रिडची "योला' याच मार्गाने तिला अमेरिकेच्या अधिपत्यात असलेल्या पोर्तो रिको ह्या बेटावर सोडणार होती.
हा उणेअधिक २५/३० तासांचा प्रवास, म्हणजे काळाच्या प्रदेशातील प्रवास समजल्या जातो. ह्या प्रवासात सख्ख्या नातेवाईकांना बरोबर घेऊन करु नये असे म्हणतात, कारण जिवंत राहाण्याच्या स्पर्धेमध्ये कोण कुणाच्या जीवावर उठेल ते सांगता येत नाही. बारा-बारा फूट उंचीच्या लाटा, पाण्यात शार्कची संख्या भरपूर, ह्या मार्गावर आधुनिक यंत्रणा नसलेल्या बोटीनी प्रवास करणं, हा दुर्दम्य आशावादाचा नमुना किंवा जगण्याची प्रबळ इच्छेचा पुरावा.
इन्ग्रिडने तो ही प्रवास सहन केला. बोटीला पडलेले भोक, प्रवाशांची एकमेकातली चाकू-सुर्याची मारामारी, पोटात पाणी ही ठरत नाही अशा सगळ्या गोष्टी पचवत तीने एकदाचा पोर्तो रिको च्या जमिनीवर पाय ठेवला. तिचे दैव बलवत्तर की अधिकार्यांच्या नजरेस न पडता ती निसटली, नाहीतर तिची रवानगी अॅक्वाडिलाच्या सीमा सुरक्षा दलाच्या तुरुंगात झाली असती. सुरवातीचे काही दिवस परीक्षेचे होते, पण तिला domestic worker चे काम मिळाले. एक-दोन महिन्यातच तिथे आलेल्या एका प्रवासी कुटंबाने तिची नगण्य पैशावर काम करण्याची तयारी बघून आपल्याबरोबर वॉशिंग्टन डी सी जवळच्या उपनगरात तिला नेले. त्यांचे ते महालासारखे घर, त्याच्या मागच्या भागात इन्ग्रिडसाठी एक खोली होती. दोन लहान मुलांना दिवसभर सांभाळणे, आणि बाकी घरकाम करणे, वेळ पडली तर स्वयंपाक करणे. तिची मालकीण मोठ्या हुद्द्यावर होती, दिवसभर कामानिमीत्त बाहेरच असायची. इन्ग्रिडला "गाव म्हणजे कुटुंब" याची सवय, त्या पार्श्वभूमीवर ह्या चार जणांच्या कुटुंबात येऊनही तिला कधी अगदी एकटे पडल्यासारखे वाटे.

तिचा इथे राहणार्या काही नातेवाईकांशी तिचा संपर्क झाला होता. एखा्या शनिवारी/रविवारी ती ट्रेन ने जाऊन त्यांना भेटून येई. तिच्याकडे कागदपत्रे नसल्याने तिला एकटीला फारसे कुठे जाता येणे शक्यच नव्हते, कार शिकावी असे एकदोनदा वाटले पण परवाना मिळणार नाही हे ठाऊक असल्यामुळे मनातल्या त्या विचाराला तिने थारा दिला नाही, स्वत:ला रोजच्या कामांमध्ये बुडवून घेतलं, मुलंही अगदी लहानपणापासून तिच्याजवळ वाढली असल्याने, त्यांना तिचा लळा होता, एकूणात काय आयुष्य मार्गाला लागले होते, स्वस्थतेची, समृध्दीचा स्पर्श तिच्या आयुष्याला झाला होता.
काही वर्षे गेली, इन्ग्रिड आता खर्या अर्थाने स्थिरावली होती, ह्या आयुष्याला. दोन्ही मुलं आता मोठी झाली होती, हायस्कूल मध्ये जायला लागली होती, ती घरात एकटीच. मागच्या रविवारी तिच्या नातेवाईकांशी बोलतांना, पेनेलोपेचा विषय निघाला, आणि तिला एकदम भरुन आलं. ती आजारी असल्याचं कळलं होतं, इतके वर्ष वर्तमानाशी नातं नसलेलं ते नातं, जिवंत झालं. जगण्यातली असोशी तिला जाणवली, कसंही करुन, काहीही करुन आपल्या बहिणीला भेटावं, असं इन्ग्रिडला प्रकर्षाने वाटलं. सुट्टीचा प्रश्न नव्हता, पैशाचा प्रश्न ही सुटण्यासारखा होता, पण आतापर्यत अगदी डोळ्यासमोर असूनही जे सत्य ती नाकारत होती, ते तिच्या समोर येऊन ठाकलंच, केवळ भेटावंसं वाटतंय, हे पुरेसं नाही, तो देश सोडलाय, पण हा देश काही माझा नाही, रोजच्या आयुष्याचा प्रश्न सुटला होता, पण तरिही आयुष्य सर्वाथाने माझे नाही, एक महत्वाचा कागद, ओळखपत्र तिच्याकडे नव्हते. ती अधूनमधून करित असलेला त्या ट्रेनच्या प्रवासापलिकडे इन्ग्रिडचे ओळखपत्राशिवाय जाणे धोक्याचे होते. ती जाणार तरी कशी?
इतकी वर्ष तिला वाटायचे, आपण त्या गरिबीच्या चौकटीतून बाहेर पडलो, आता पुढे मोकळं आकाश, आपल्या हातात न मावणारं! पण आज पु्न्हा एका नविन चौकटीची जाणीव झाली तिला, आणि त्या चौकटीच्या भाराने ती हतबल झाली.
त्या एका गरिबीची चौकट मोडता मोडता सारं आयुष्य खर्ची पडलंय, हे जाणवलं. एक चौकट मोडून आयुष्य मोकळं होत नसतं, पुन्हा पुन्हा हाच प्रवास, वेगवेगळ्या चौकटी मोडून काढण्यासाठी करावा लागतो, ह्या सत्याची बोचरी तिला जाणीव झाली, आणि तिने पुन्हा एकदा सगळे बळ एकवटले, आणि तिच्या मालकीणे कडे जाऊन उभी राहीली, तिच्या कागदपत्रांबाबत काही करता येईल कां हे विचारण्यासाठी !!

No comments:
Post a Comment